सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदतवाढ केली होती. परंतु आता काही महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याने सरकारने 15 ऑक्टोबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख ठेवलेली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तीन दिवस उरले आहेत.
विधानसभा निवडणुकीचा विचार करता राज्य सरकार अनेक योजना आणत आहेत. आणि महिलांना याचा जास्त फायदा देत आहे. अशातच राज्य सरकारने जुलै महिनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळाले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे 3 हजार रुपये ऍडव्हान्स मध्ये महिलांना मिळालेले आहेत.
राज्य सरकारने केलेल्या मुदतवाढीनुसार ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही. त्यांनी 15 ऑक्टोबर आधीच अर्ज 2024 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत महिलांना या लाडके बहिणी योजनेसाठी अर्ज करता येणार आहेत. परंतु यावेळी हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने न स्वीकारता अंगणवाडी सेविकांमार्फतच स्वीकारले जाणार आहेत.
दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. सध्या दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जात आहे
अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र?
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना महिलांना त्यांचे आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, उमेदवाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो हे कागदपत्र द्यावे.
अर्ज करताना कोणत्या अटी आहेत?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. तसेच जर महिन्याचा जन्म इतर राज्यात झालेला असेल, आणि तिचा पती जर महाराष्ट्रातील असेल, तरी देखील ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. तसेच अविवाहित घटस्फोटीत विधवा आणि महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलेचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे बँक खाते असणे गरजेचे आहे. तसेच महिलेचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे असते.