कोयना धरणाचा आपत्कालीन दरवाजा आज उघडणार; ‘इतका’ TMC झालाय पाणीसाठा

0
1657
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | गेल्या महिनाभरापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलपातळी झपाट्याने वाढली आहे. वाढती जलपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज दुपारी १२:०० वाजता आपत्कालीन विमोचक दरवाजा उघडण्यात येणार आहे.

प्रशासनाने जलपातळी नियमनासाठी हाती घेतलेला संयमित, पूर्वनियोजित व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रयोग आहे. वाढलेला विसर्ग लक्षात घेता, कोयना नदीच्या काठावर वसलेल्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोयना प्रकल्प प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत.

कोयना धरणाची विद्यमान स्थिती (२ जुलै, सकाळी ८:०० वाजता)

जलपातळी : 2114’01” (644.373 मीटर)
एकूण साठा : 56.03 टीएमसी (53.24%)
आवक (Inflow) : 28,179 क्युसेक (2.43 टीएमसी)
विसर्ग : पायथा विद्युतगृह (KDPH): 1050 क्युसेक
नदी विमोचकाद्वारे (आजपासून) : 2676 क्युसेक
एकूण विसर्ग: 3726 क्युसेक

पर्जन्यमान (दैनंदिन / एकूण मिमी):
कोयना : 58 / 1609
नवजा : 70 / 1394
महाबळेश्वर : 59 / 1512