कोयना धरण 88.38 टक्के भरले; ‘इतका’ TMC जमा झाला पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । गत आठवडाभरापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात तसेच कोयना धरणक्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने कोयना धरणाचा पाणीसाठा 93.02 टीएमसीवर पोहोचला. तर धरण भरण्यासाठी आता 12 टीएमसीची पाण्याची गरज आहे. त्याचबरोबर काेयनेला 31 तर नवजाला 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सातारा जिल्ह्याच्या पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, तापोळा, बामणोली भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत सर्वाधिक पावसाची नोंद कोयनेला 31 मिलीमीटरची झाली आहे. यानंतर नवजा आणि महाबळेश्वर येथे प्रत्येकी 21 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून शनिवारी सकाळच्या सुमारास 5257 क्यूसेक वेगाने पाणी येत होते.

तर शुक्रवारी सकाळच्या सुमारास 1600 क्यूसेक वेेग होता. यावरुन धरणातील आवक पावसामुळे वाढल्याने साठाही वाढत चालला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात 93.02 टीएमसी पाणीसाठा झाला होता. यावरुन धरणात 88.38 टक्के साठा झाल्याचे स्पष्ट झाले. तर धरण भरण्यासाठी अजून १२ टीएमसीवर पाण्याची गरज आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी ही मोठी धरणे आहेत. यामधील उरमोडीतील पाणीसाठा चिंताजणक आहे. अजुनही बहुतांशी धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे.

Koyna Dam
Date : 30/09/2023
Time : 05:00 PM
Water level : 2154′ 02″ (656.590m)

Dam Storage :
Gross : 93.23 TMC (88.58%)
Live : 88.11 TMC (88.00%)

Inflow : 6,459 cusecs

Discharges
KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River : 00 Cusecs

Rainfall in mm : (Daily/Cumulative)
Koyna : 01/3960
Navaja : 02/5574
Mahabaleshwar : 02/5370