कोयना धरण 70 टक्के भरलं; धरणाचा पाणीसाठा झाला 74.22 TMC

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरल्यानंतर राज्यात ढगाळ हवामानासह उन्ह सावल्यांचा खेळात अधून-मधून हलक्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, आज मंगळवारी हवामान विभागाने कोकणासह, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ चा इशारा दिला आहे. तसेच पाटण तालुक्यातील कोयना धरण क्षेत्रात पाऊस कोसळत असून धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 24 हजार 201 क्युसेस अशी सुरू आहे. तर धरणात सध्या 74.22 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, सकाळी 9 वाजता दुसरे युनिट सुरू करण्यात आले असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 74.22 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तसेच गेल्या 24 तासात कोयनेला – 97 मिलीमीटर, नवजा- 163 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 124 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला – 2 हजार 827, नवजा – 4 हजार 051 आणि महाबळेश्वरला – 3 हजार 757 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणातून 2100 क्युसेस इतक्या क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात धोम आणि बलकवडी ही धरणे आहेत. बलकवडीचे पाणी धोममध्ये येते. सध्या या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून बलकवडीतून विसर्ग करण्यात आल्याने धोम धरणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धोम धरणाच्या दरवाजातून सोमवारपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी कृष्णा नदीत जात आहे. त्यामुळे कृष्णेच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे.

कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –

Koyna Dam
Date : 01/08/2023
Time : 08:00 AM
Water level : 2134′ 08″ (650.646m)

Dam Storage :
Gross : 74.22 TMC (70.52%)

Inflow : 24,201 cusecs

Discharges
KDPH : 1050 Cusecs.
Total Discharge in koyna River : 1050 Cusecs

Rainfall in mm: (Daily/Cumulative)
Koyna : 97/2827
Navaja : 163/4051
Mahabaleshwar : 124/3757

कराड पाटण तालुक्यातील महत्वाच्या पुल परिसरातील पाणीपातळी पहा

1) कोयना जुना पूल (कराड)
पाणी पातळी – 556.171(20ʼ03″) इशारा (45ʼ) (धोका – 58ʼ4ʼʼ)

2) वारुंजी
पाणी पातळी – 555.337 (19’4″) विसर्ग (15454 क्युसेक) (इशारा – 43’10”)(धोका – 51ʼ8″)

3) हेळवाक पुल
पाणी पातळी – 574.30 मी. (ईशारा 576.80 मी.) (धाेका 578.60 मी)

4) केरा पुल पाटण
पाणी पातळी – 567.30 मी. (ईशारा 570.45 मी.) (धाेका 572.97 मी.)