कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातसहा कराड, पाटण तालुक्यात काल रात्री सोमवारी आणि आज मंगळवारी विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. अचानक झालेल्या पावसाने बेसावध वाहनधारक, पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. आजही पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरणातील व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कोयना धरणात 105.14 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यास येलो अर्लट दिला असल्याने आज रात्रीही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
कराड शहरासह जिल्ह्यात सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली होती. सोमवारी सकाळपासूनच आकाश निरभ्र होते. तसेच दिवसभर पडलेल्या कडक उन्हामुळे लोकांची तगमग झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास आकाशात काळे ढग जमून पावसाचा शिडकावा झाला. मात्र, सायंकाळी आठ वाजल्यानंतर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. लगेचच पावसाचे जोरदार आगमन झाले.
या पावसाने शहरात पाणी-पाणी केले. सोमवार असल्यामुळे कामाच्या व्यापात कार्यालयात जास्त वेळ गुंतलेल्या कर्मचाऱ्यांची या पावसाने चांगलीच तारांबळ केली. पाऊस थांबेपर्यंत कर्मचाऱ्यांना कार्यालयातच थांबावे लागले. तसेच काहींनी पावसात भिजतच घर गाठल्याचे पहायला मिळाले. नवरात्रोत्सवाची शहरात जोरदार तयारी सुरु आहे. दुगदिवींच्या मूर्तीचेही आगमन करण्याचे बेत मंडळांनी आखले होते. या पावसामुळे या मूर्तीना प्लास्टिकच्या कागदाने झाकावे लागले.
मात्र, उन्हामुळे अंगाची काहिली झालेल्या कराड शहरातील नागरिकांना या पावसाने दिलासा दिला.
आज दिवसभर पावसाची रिपरिप
काल सोमवारी रात्रीभर पावसाने चांगलेच झोफपून काढल्यानंतर सकाळी काहीशी पावसाने विश्रांती घेतली. मात्र, उपरनंतर पुन्हा पावसाने सुरुवात करीत कराड शहरात हजेरी लावली. पावसामुळे वातावरणात निर्माण झालेला उकाडा नाहीसा होऊन गारवा निर्माण झाला.
Koyna Dam
Date: 01/10/2024
Time: 08:00 AM
Water level: 2163’05” (659.409m)
Dam Storage:
Gross: 105.14 TMC (99.90%)
Live: 100.02 TMC (99.89%)
Inflow : 5,916 Cusecs.
Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 2100 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 00/5534
Navaja- 01/6790
Mahabaleshwar- 00/6471