कोयना धरणाचे दरवाजे 24 तासांत उघडणार? पालकमंत्र्यांनी देखील घेतली आढावा बैठक

0
455
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुलाधार पाऊस कोसळत असल्यामुळे कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. दिवसाला सरासरी २ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ होत असून सध्या धरणात ७१.०० टीएमसी साठा झाला आहे. दरम्यान, कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील अशी स्थितीत निर्माण झाली असून त्या अनुषंगाने आज पर्यटनमंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देशी यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची दृकश्राव्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली व नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या आवाहन करावे, अशा सूचना दिल्या.

कोयना धरणात मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक झपाट्याने होत आहे. दरम्यान, धरणाची गेट लेव्हल ७३.५० टीएमसी आहे. अवघ्या २.५० टीएमसी अंतरावर ही मर्यादा गाठली जाणार असल्याने पुढील २४ तासांत धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेट लेव्हल गाठल्यावर वक्रदरवाजांना पाणी टेकते आणि धरणातून नियंत्रीत विसर्ग सुरू केला जातो. दरवाजे उघडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जातील, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अशी माहिती कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांच्या वतीने देण्यात आली आहे.