पाटण प्रतिनिधी । आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत असून हवामान विभागाने आज सातारा जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले आहे. दरम्यान पाटण तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणात 64.32 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 138 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने आज (ता. २७) दुपारी ४ वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज दुपारी चार वाजता कोयना धरणाचे दुसरे युनिट सुरू केल्यानंतर कोयना नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग २१०० क्युसेक होणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर व महाबळेश्वरला १२४ मिलिमीटर आणि नवजाला १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जलाशयात प्रतिसेकंद ४२ हजार ६६९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाऊस व पाणीसाठा
जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 88.89 अब्ज घन फूट पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत.
मोठे प्रकल्प : कोयना – 59.06 (58.99), धोम – 7.34 (62.79), धोम – बलकवडी – 3.39 (85.61), कण्हेर – 5.26 (54.85), उरमोडी -5.02 (52.02), तारळी – 5.01 (85.79). मध्यम प्रकल्प : येरळवाडी – 0.01 (1.45), नेर – 0.08 (19.47), राणंद – 0.01 (0.42), आंधळी – 0.02(08.02), नागेवाडी – 0.06 (27.62), मोरणा – 0.89(68.23), उत्तरमांड – 0.40 (46.51), महू – 0.88 (81.10), हातगेघर – 0.11 (42.56), वांग (मराठवाडी) – 1.35 (49.63) या प्रमाणे पाणीसाठा आहे.
कोयना धरणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात 138 मि.मी. पावसाची नोंद झाली असून मोरणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात 20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच धोम – 8 मि.मी., धोम – बलकवडी – 42, कण्हेर – 16, उरमोडी – 18, तारळी – 26, येरळवाडी – 4, उत्तरमांड – 15, महू – 22, हातगेघर – 22, वांग (मराठवाडी) – 13, नागेवाडी- 6 मि.मी पाऊस झाला आहे. तर नेर, राणंद, आंधळी धरणाच्या क्षेत्रातील कालचा पाऊस निरंक आहे.
पहा महत्वाच्या ठिकाणाची पाणीपातळी
1) कराड येथील कोयना जुना पूल परिसरात नदी पात्राची पाणी पातळी ५५५.९४३ (१९ʼ६”) इतकी असून (इशारा – ४५ʼ) (धोका – ५८ʼ४ʼʼ) अशी इशारा व धोका पातळी आहे. २) वारुंजी परिसरात नदीतील पाणी पातळी – ५५५.१३७ (१८’८”) असून विसर्ग १४ हजार ४६५ क्युसेक इतका विसर्ग सुरु आहे. तसेच (इशारा-४३ʼ१०”) (धोका – ५१ʼ८”) अशी इशारा व धोका पातळी आहे. 3 ) हेळवाक पुल येथे नदीतील पाण्याची पातळी हि ५७४.४० मी. इतकी असून (इशारा ५७६.८० मी.) (धाेका ५७८.६० मी) अशी धोका व इशारा पातळी आहे. तर ४) केरा पुल परिसरातील पाण्याची पातळी हि ५६७.५० मी. इतकी आहे. तर (इशारा ५७०.४५ मी.) (धाेका ५७२.९७ मी.) अशी इशारा व धोका पातळी आहे.