सातारा प्रतिनिधी । भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दि. 26 जुलै 2024 रोजी सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना उद्या दि. 26 जुलै रोजी सुट्टी जाहिर केली आहे.
सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. शाळा व महाविद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत संबधीत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, तसेच इयत्ता 10 वी व 12 वी च्या जुलै 2024 च्या फेर परीक्षा राज्य मंडळ पुणे यांचे वेळापत्रकानुसार सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी डूडी यांनी आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, सातारा तालुक्यातील कण्हेर धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे. आज, गुरूवारी दुपारनंतर धरणाचे वक्र दरवाजे उचलून ५ हजार क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठा 77.70 टीएमसीवर पोहोचला आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गुरूवारी दुपारी चार वाजल्यानंतर धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडण्यात आले असून नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गृह विभागाची बोट वाऱ्यामुळे सुटून कोयना धरणाच्या भिंतीकडे; तासभर विलंबाने उघडणार दरवाजे
कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज चार वाजता उघडण्यात येणार होते. परंतु, गृह विभागाची बोट धरणाच्या भिंतीकडे आल्यामुळे दरवाजे उघडण्यास विलंब झाला आहे. आता सायंकाळी ५ वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. धरण क्षेत्रात पावसाबरोबर वाऱ्याचाही जोर आहे. धक्क्याच्या ठिकाणी बांधून ठेवलेली गृह विभागाची बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सुटून धरणाच्या दरवाज्याजवळ आल्यामुळे दरवाजे उघडण्यास अडचणी आल्या.
Koyna Dam
Date: 25/07/2024
Time: 03:00 PM
Water level: 2138’07” (651.840m)
Dam Storage:
Gross: 77.70 TMC (73.82%)
Live: 72.58 TMC (72.48%)
Inflow : 85,035 Cusecs.
Discharges
KDPH: 1050 Cusecs.
Total Discharge in koyna River: 1050 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 60/3117
Navaja- 55/3677
Mahabaleshwar- 60/3168