पाटण प्रतिनिधी | कोयना परिसरात मुसळधार पावसाने दहा दिवसांपासून हाहाःकार उडवल्यामुळे निर्माण झाला आहे. पुर परिस्थितीची व नुकसानीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी केली. या सर्व लोकांना निवाराशेड नवीन बांधून देण्यासाठी कोयना प्रकल्पाने तातडीने खोल्या उपलब्ध करून देण्याची हालचाल करावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी प्रशासनाला दिल्या.
तीन वर्षांपूर्वी भूसल्खनग्रस्त असणाऱ्या मिरगाव या गावातील अनेक बाधितांना कोयनानगर येथे निवारा शेड देण्यात आली नाहीत. त्याचबरोबर हेळवाक येथील काही घरांना दरड कोसळण्याची भीती असून त्यांनी कोयनानगर येथील दरडग्रस्तांसाठी बांधलेल्या निवारा शेडमध्ये आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहॆ.
मुसळधार पावसात कोयना विभागातील कोयना-नवजा हा रस्ता खचला असून वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहॆ. त्याचबरोबर विभागात निर्माण झालेल्या पुर परिस्थितीची पाहणी जीवन गलांडे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत मंडलधिकारी संजय जंगम, तलाठी निलेश भाग्यवंत, कृष्णा देवकर, कोतवाल अरुण चाळके, पोलीस पाटील संभाजी चाळके, श्रीकांत शेलार, सुनील शेलार, महेश शेलार, विजय शेलार आदी उपस्थित होते.
कोयना-नवजा रस्ता पाबळ नाला येथे खचला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहॆ. या रस्त्याला पर्यायी रस्ता असावा जेणेकरून या ठिकाणची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल याचा विचार सध्या सुरू आहॆ. मिरगावातील जनता निवाराशेडमध्ये राहते का नाही याची खातरजमा त्यांनी गावात जाऊन प्रत्येक घराची तपासणी केली. ओझर्डे धबधबा पर्यटनासाठी चालू आहॆ की बंद याची तपासणी त्यांनी यावेळी केली.