पाटण प्रतिनिधी । कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु पडत असून जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पाऊस सुरु असून कोयनेच्या जल साठ्यात देखील चांगली वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 56.83 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 54.00 टक्के भरले आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असून रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 80 तर नवजाला 112 आणि महाबळेश्वरमध्ये 145 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. शनिवारी रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे कृष्णा आणि कोयना नदीतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. रात्रं दिवस तसेच मुसळधारपणे पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात पाणीसाठा साठ टीएमसीचा टप्पा लवकरच पार करणार आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 2 हजार 473 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 2 हजार 959 आणि महाबळेश्वरमध्ये 2 हजार 404 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात आवक वाढली असून रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारापर्यंत 54 हजार 239 क्यूसेक वेगाने पाणी येत होते.
Koyna Dam
Date : 21/07/2024
Time : 05:00 PM
Water level : 2115’00” (644.652m)
Dam Storage
Gross : 56.83 TMC (54.00%)
Live : 51.71 TMC (51.64%)
Inflow : 54,239 Cusecs.
Discharges
KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River : 00 Cusecs
Rainfall in mm – (Daily/Cumulative)
Koyna – 80/2473
Navaja – 112/2959
Mahabaleshwar – 145/2404