पाटणला मुसळधार पावसाची हजेरी; रस्ता खचला तर सहा घरांची पडझड

0
533
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सहा घरांची पडझड झाली. सांगवड गावपोच रस्ता खचला आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती केली असून, पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती तहसीलदार अनंत गुरव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

मुसळधार पावसामुळे चंद्रकांत ज्ञानू साळुंखे (झाकडे), धनंजय जयवंत यादव (टेळेवाडी), चंद्रकांत श्रीपती देवकांत (काळोली), संजय लक्ष्मण निकम (येरफळे), सरसाबाई आनंदा पुजारी (साखरी) आणि बाबू शाहू ढेरे (ढाणकल) या सहा जणांच्या घरांच्या भिंती अतिवृष्टीमुळे पडल्या.

पडलेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, नवारस्ता, ढेबेवाडी मार्गावरील सांगवड पुलापासून थोड्या अंतरावर सांगवड गावपोच रस्ता मुसळधार पावसाने खचला आहे. प्रशासनाने खचलेल्या ठिकाणी भराव टाकून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत खुला केला आहे.