पाटण प्रतिनिधी | हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यानंतर दिवसभरात रविवारी मुसळधार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस रविवारी दिवसभर पडला. रविवारी कोयना धारण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 40.43 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 38.41 टक्के भरले आहे. तर धरणात 48 हजार 611 क्युसेक्स इतक्या पाण्याची आवक झाली आहे.
सोमवारी सकाळपर्यंत नवजा येथे 274 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे 187 आणि महाबळेश्वरला 99 मिलीमीटरची नोंद झाली होती. चोवीस तासात नवजा, कोयनामध्ये चांगले पर्जन्यमान झाले असून रविवारी दिवसभर मुसळधार पडलेल्या पावसामुळे कोयना धरणाचा पाणीसाठा 40.43 टीएमसी झाला आहे.
सातारा जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 1 हजार 982 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 2 हजार 299 आणि महाबळेश्वरमध्ये 1 हजार 752 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
Koyna Dam
Date: 15/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2094’08” (638.454m)
Dam Storage:
Gross: 40.43 TMC (38.41%)
Live: 35.31 TMC (35.26%)
Inflow : 48,611 Cusecs.
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 187/1982
Navaja- 274/2299
Mahabaleshwar- 99/1752