कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; धरणात ‘इतका’ झाला पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजा येथे 74 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 68 आणि महाबळेश्वरला 60 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. सध्या साडेपाच हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. मागील 15 दिवसांपासून पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळासह पाटण तालुका आणि कांदाटी खोऱ्यात पाऊस सुरू झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने लावलेल्या हजेरीमुळे भुईमुगासह सोयाबीन आदी बियाणांची ठिकाणची पेरणीची कामे शेतकऱ्यांनी सुरु केली आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे पडलेला आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी भागातही दमदार हजेरी लागली आहे. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. तसेच बंधाऱ्यातही पाणीसाठा झाला आहे. त्यातच शेत जमिनीत पाणी साठल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे.

Koyna Dam

Date : 22/06/2024
Time : 08:00 AM
Water level : 2044”11” (623.291m)

Dam Storage :
Gross : 15.91 TMC (15.12%)
Live : 10.79 TMC (10.77%)

Discharges
KDPH : 00 Cusecs.
Total Discharge in koyna River : 00 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna – 68/507
Navaja – 74/626
Mahabaleshwar – 60/421