पुन्हा मुसळधार पाऊस; कोयना धरणात वाढला ‘इतका’ टीएमसी पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने सहा धरणांतून एकूण ५८ हजार ४१८ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे कृष्णा, कोयना, तारळी, वेण्णा, उरमोडी नद्या दुधडी भरून वाहत आहेत. दरम्यान रात्रभर पडलेल्या पावसामुळे कोयना धरणात आज सकाळी आठ वाजेपर्यंत 85.81 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. पावसामुळे धरण 81.53 टक्के भरले असून धरणात 42 हजार 787 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातून 45 हजार 168 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.

Koyna Dam

Date: 01/08/2024
Time: 08:00 AM
Water level: 2147’08” (654.609m)

Dam Storage:

Gross: 85.81 टीएमसी (81.53%)
Live: 80.69 TMC (80.58%)

Inflow : 45,168 Cusecs.

Discharges
Radial Gate: 40,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 42,100 Cusecs

Rainfall in mm-*(Daily/Cumulative)
Koyna- 88/3763
Navaja- 124/4436
Mahabaleshwar- 84/4098