सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाच्या खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेत फलटण पोलीसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत दुहेरी खुनाच्या गुन्ह्याचा 10 तासांच्या आत छडा लावत आरोपीस जेरबंद केले.
सुमित तुकाराम शिंदे (वय २०) व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके (वय ३५, दोघे रा. सुंदरनगर, निभोरे, ता. फलटण) असे मृत बहीण भावाच्या नाव आहे. तर रणजित मोहन फाळके, (वय ४५) असे अटक केल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निर्भोरे, ता. फलटण गावचे हद्दीत पालखी महामार्गालगत सुमित तुकाराम शिंदे व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके यांचे मृतदेह रस्त्याचे कडेला मिळुन आले. यानंतर पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दोघांच्या छातीवर धारदार व टोकदार भोकसल्यामुळे त्यातुन रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. सदर घटनेतील दोन्ही मृत व्यक्ती हे नात्याने सख्खे बहीण भाऊ होते. त्या दोघांचे खुन अज्ञात व्यक्तीने केला म्हणुन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे नेतृत्चाखाली तपास पथके तयार केली. तसेच त्यांना मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.
निभोरे, ता. फलटण येथील घटनास्थळावर काहीही धागे धोरे नसताना पोलीसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरु केला आणि तपासात त्यांना असे निष्पन्न झाले की, मयत स्त्री शीतल तुकाराम शिदे उर्फ शीतल रणजित फाळके हीने दोन वर्षापूर्वी तिचा पहिला नवरा कनव-या भिम-या पवार (रा. वाळवा, जि. सांगली) यास सोडुन देऊन रणजित मोहन फाळके (मुळ गाव सातारारोड, ता. कोरेगाव, जि. सातारा) याचेबरोबर तिच्या आईवडीलां जवळ झोपडीमध्ये राहत होती.
सदरची घटना घडली त्यावेळी रात्री सुद्धा रणजित मोहन फाळके हा तिच्यासोबत झोपडीमध्ये झोपला होता. परंतु दोघांचे मृतदेह मिळून आल्यानंतर त्याने तेथुन पलायन केले होते. पोलीसांनी त्यास (सातारारोड, ता. कोरेगाव) येथून ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपुस केली. त्यावेळी त्याने सुरुवातीला दिशाभूल करणारी उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने दि. २५/०५/२०२४ रोजी मध्यरात्रीचे सुमारास शीतल ही झोपेतुन उठुन परपुरुषाबरोबर कोठेतरी जात असल्याचे दिसल्यामुळे तो झोपडीतील चाकु घेऊन तिच्या मागोमाग गेला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याने शीतलला गाठुन तिच्या छातीवर चाकू खुपसून तिचा खुन केला. त्यावेळी तिच्यासोबत असलेला तिचा भाऊ सुमित तुकाराम शिंदे यास त्याने अंधारात न ओळखल्यामुळे त्याने तो परपुरुष आहे, असे समजुन त्याने त्याच्याही छातीत चाकु खुपसुन त्याचाही निघुण खुन केला आहे.
तपासामध्ये मयत बहीण भाऊ हे ‘अनुसुचित जमाती ‘ या प्रवर्गातील असल्याचे व आरोपी रणजित मोहन फाळकेहा ‘खुल्या’ प्रवर्गातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अँट्रॉसिटी कायद्यातील कलमांची वाढ केली आहे. तसेच आरोपीस अटक केली आहे.
पोलिस अधीक्षक समीर शेख, श्रीमती ऑचल दलाल, राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली श्री. अरुण देवकर, श्री. सुनिल महाडीक, नवनाथ रानगट, अशोक हलगे, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, मच्छि्द्र पाटील, गोपाल बदने,पोलीस अंमलदार मोहन हंगे, पांडुरंग हजारे, बन साबळे, महादेव पिसे, संतोष सपकाळ, प्रविण पफडतरे,अरुन पाटील, शिवाजी मिसे, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, ऑंकार यादव, मोहनपवार, रोहित निकम, विशाल पवार, वैभव सार्वंत, केतन शिंदे, शिवाजी गुरव, अमृत कर्पे, वैभव सू्यवंशी, नितीनचतुरे, संदीप मदने, अमोल जगदाळे, विक्रम बनकर, श्रीनाथ कदम, अमोल पवार, संजय देशमुख, अमोलदेशमुख, संभाजी साहुंखे, विक्रम कुंभार, हनुमंत दडस, रशिदा पठाण, प्रिती काकडे, उर्मिला पैंदाम, भाग्यश्रीसुरुम, श्रीकांत खरात, अरुधती कर्णे, शिवराज जाधव सदरची कारवाई केली आहे. गुन्ह्याचा प्राथमिक तपासपोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांनी केला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस हे करीत आहेत.