कराड पुरवठा विभागातील अधिकारी, स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू : मनोज माळी

Karad News 9 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी पुरवठा विभाग येथील अधिकाऱ्यांशी संगनमत करून धान्य कमी प्रमाणात वाटप केले आहे. याबाबतची तक्रार दि. 27 ऑक्टोबर रोजी तहसीलदारांकडे केली होती. मात्र, तक्रारीवरून संबंधितांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. दि. १५ डिसेंबर पर्यंत संबंधितांवर कारवाई न केल्यास धरणे आंदोलन करू, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली … Read more

सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून वादाची ठिणगी?

Satara News 20231210 165820 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीवरून अनेक घडामोडींना वेग आला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेत महायुती विरुद्ध व्यूहरचना आखली. त्यानंतर आता महायुतीतील भाजप पक्षाच्या एका नेत्याने भाजप आपला उमेदवार उभा करून सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवणार असल्याचं सांगून टाकलं आहे. भाजप … Read more

सातारा जिल्हा परिषद नोकर भरती परीक्षेचा पाचवा टप्पा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

Satara Zilla Parishad News jpg

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाने जिल्हा परिषदेतील नोकर भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. वर्ग तीन संवर्गातील पदे परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. ही नोकर भरती राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेत होत आहे. सातारा जिल्हा परिषद नोकर भरती वर्ग तीनसाठी मागील दोन महिन्यांपासून परीक्षा सुरू आहे. या भरतीतील परीक्षेचा पाचवा टप्पा दि. १८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. … Read more

सातारा जिल्ह्यातील 25 हजार कर्मचारी जाणार संपावर; नेमकं कारण काय?

Satara News 20 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचारी पुन्हा १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातीलही २५ हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. या कारणाने शासकीय कामकाज ठप्प होणार असून याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करावी ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरीही … Read more

…तर अगोदर बाधित शेतकऱ्यांच्या प्रेतावरुन जावे लागेल याद राखा : डॉ.भारत पाटणकर

Karad News 20231210 092501 0000 jpg

कराड प्रतिनिधी | बाधितांच्या पुनर्वसनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कराडला विमानतळ विस्तार वाढीचा घाट काही लोकांनी घातला आहे. खरं सांगायचं झालं तर या विरोधात २०१० पासून आमचा अविरत लढा सुरू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हा लढा कायम राहणार आहे. त्यामुळे जर सरकारने हे विस्तारीकरण करण्याचा दबावाने प्रयत्न केलाच तर त्यांना अगोदर या बाधित शेतकऱ्यांच्या प्रेतावरून जावे … Read more

राज्यात सर्वप्रथम साताऱ्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Satara News 19 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा येथे कोणत्या पक्षाचा कोणता खासदारकीचा उमेदवार असणार? अशी चर्चा सुरु असताना आज सातारा येथे महाविकास आघाडीतील नेत्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी राज्यातीळ महायुतीसह देशातील मोदी सरकारविरोधात व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा मोठा … Read more

पाटणच्या युवकानं Facebook वर मैत्री झालेल्या सांगलीच्या डॉक्टर महिलेसोबत केलं असं काही…

Crime News 4 jpg

कराड प्रतिनिधी । सोशल मीडियातील फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी युवकांसोबत ओळख झाल्यास त्याच्याकडून फसवणूक होण्याच्याही घटना आपण ऐकल्या असतील. अशीच घटना सांगलीच्या एका डॉक्टर महिलेसोबत घडली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या डॉक्टर महिलेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताकडे पीडितेने उसने पैसे परत मागताच तिचा ‘मॉर्फ’ केलेला अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देत … Read more

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रांताधिकाऱ्यांकडून ढेबेवाडीत कामाचा आढावा

Special Brief Revision Program News jpg

कराड प्रतिनिधी । मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पाटण तालुक्यातील ढेबेवाडी व तळमावळे येथील महसूल मंडलातील बीएलओमार्फत मयत मतदारांची यादी बनवून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कामाचा आज पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी प्रत्यक्ष भेट देत आढावा घेतला. प्रांताधिकाऱ्यांनी ढेबेवाडी विभागात प्रत्यक्ष पाहणी करून मृत्यूच्या नोंदी नसलेल्या ठिकाणी संबंधित मयत … Read more

कराडच्या कोल्हापूर नाक्यावर ‘मनसे’चे इंग्रजी फलका विरोधात ‘खळखट्याक’ आंदोलन

Karad News 8 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरासह तालुक्यातील दुकानांवरील इंग्रजी फलक काढुन त्या ठिकाणी मराठा फलक लावावेत अन्यथा खळखट्याक आंदोलन करून असा इशारा काही दिवसांपूर्वी मनसेच्या कराड येथील पदाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, याकडे दुकानदारांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आज कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील एका दुकानावरील इंग्रजी फलक मनसेचे तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण यांच्या नेतृत्वाखाली हटवून … Read more

मराठा विद्यार्थ्यांच्या खात्यावर साडेपाच कोटी; जिल्ह्यातील ‘इतक्या’ हजार जणांना मिळाला लाभ

Satara News 18 jpg

सातारा प्रतिनिधी । मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटातील किमान उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, शैक्षणिक विकासास हातभार लावणे, त्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करणे आदी विविध उद्देशाने प्रेरित होऊन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण विकास व प्रशिक्षण मानव विकास (सारथी) संस्था (पुणे) काम करते. संस्थेच्या माध्यमातून मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व … Read more

कुणबी दाखल्यांच्या अडचणी सुटणार; मराठ्यांचे राज्यातील पहिले जनसंपर्क कार्यालय कराडात सुरु

Karad Kunbi Certificate PRO Office News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासणीची मोहीम वेगाने सुरू आहे. महसूल दप्तरांची तपासणी करून कुणबी नोंदी तपासल्या जात आहेत. कुणबी नोंदींसंदर्भात लोकांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर व्हावी आणि कुणबी दाखले काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती मिळावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी कराडमधील कराड अर्बन बॅंकेच्या तळभाग शाखेच्या खालील बाजूस जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. … Read more

अनधिकृत उपसा सिंचन पंप काढून घ्या; अन्यथा कठोर कारवाई करू; कोयना सिंचन विभागाचा इशारा

Koyna Irrigation News jpg

पाटण प्रतिनिधी । कोयना सिंचन व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृतपणे पाणी उचलत असलेल्या उपसा सिंचन योजनाधारकांनी आपले उपसा सिंचन पंप तात्काळ काढून घ्यावेत. अन्यथा त्यांच्यावर पाटबंधारे अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोयना सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या वतीने देण्यात आला आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे जुलै २०२४ अखेर पिण्याचे पाणी … Read more