विधवा आई अन् 16 वर्षाच्या लेकीला फरफटत नेत केली मारहाण; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

Phaltan Police Station

कराड प्रतिनिधी | मणिपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये झालेल्या संघर्षातून दोन आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण समोर आले. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात असताना सातारा जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना रविवारी घडली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द गावात मायलेकीला संपूर्ण गावासमोर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघींचे कपडेही फाटले. याबाबतची … Read more

कोयना धरणातून तब्बल 24 दिवसानंतर ‘इतक्या’ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

Koyana dam rain

कराड प्रतिनिधी | मुसळधार पावसामुळे कोयना जलाशयात पाणी साठा होऊ लागला असल्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढू लागली आहे. दरम्यान, आज दुपारी 4 वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातून कोयना नदी पात्रात 1 हजार 50 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण प्रशासनाच्या वतीने … Read more

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा ‘त्या’ सुवर्ण क्षणांचा व्हिडिओ अखेर 71 वर्षांनंतर जगासमोर !

KhashabaJadhav

कराड प्रतिनिधी | संतोष गुरवहेलसिंकी येथे जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वर गावचे पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला 1952 साली कांस्यपदक मिळवून दिले. त्यावेळी करण्यात आलेल्या पदक वितरण समारंभाची चित्रफीत 71 वर्षांनी जागतिक ऑलिम्पिक संघटनेने नुकतीच प्रसारित केली आहे. कराड तालुक्यातील गोळेश्वर गाव असलेल्या खाशाबा जाधव यांच्या नावाने सुरू होणाऱ्या कुस्ती संकुलाचे काम … Read more

कराड उत्तरेत आम्हीच विकासकामे मंजूर केल्याची काहींकडून वल्गना; बाळासाहेब पाटलांची BJP नेत्यांवर टीका

Balasaheb Patil News

कराड प्रतिनिधी । राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात आमदारांच्या मतदार संघातील प्रस्तावित असलेल्या विकासकामांना मंजुरी दिली जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात भाजप नेत्यांकडून अनेक विकास कामे आम्हीच मंजूर करून आणल्याचे सांगितले गेले असल्याने यावर आमदार बाळासाहेब पाटील यांनी आक्षेप … Read more

1 रुपयांत पिक विमा घेण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंतच मुदत; जिल्हा कृषी अधीक्षक फरांदेंची महत्वाची माहिती

Bhagyashree Farande News

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी खरीप हंगामासाठी पंतप्रधान फसल बीमा योजना सुरु केली आहे. या योजनेत ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या तारखेपर्यंतच या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. सातारा जिल्ह्यातून आतापर्यंत सुमारे ३६ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती … Read more

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RTO कडून 35 स्कूल बसवर कारवाई; 2 बसेस जप्त

Regional Transport Office in Satara News

कराड प्रतिनिधी । सध्या पावसामुळे शाळेतील मुलांना शाळेत जाण्यास उशीर होत असल्याने त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी स्कुल बसेस लावल्या आहरेत. या स्कुल बसमधून विद्यार्थी शाळेत ये-जा करत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कुल बसेसमध्ये सर्व आपत्कालीन साधने आहेत का? त्यांच्या चालकांकडून किती वेगाने स्कुल बसेस चालवली जातात? याची तपासणी साताऱ्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत नुकतीच … Read more

पुणे – सातारा मार्गावर अचानक फुटतायत वाहनांचे टायर; नेमकं कारण काय?

Pune Satara Roads

कराड प्रतिनिधी । दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार हे तसे फाईल तर उन्हाळा या ऋतूमध्ये घडतात. मात्र, पुणे – सातारा या मार्गावरील रस्त्यावर चक्क पावसाळ्यात वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार घडत आहेत. अचानक टायर फुटल्याने शिवाय जवळ कोणतेही टायर बसवण्याचे गॅरेज नसल्यामुळे वाहनचालकांचे चांगलेच हाल होत आहेत. पुणे – सातारा या महामार्गावरील धांगवडी ( … Read more

“आता जीव गेल्यावर आमचं पुनर्वसन करू नका”; ‘या’ गावातील संतापलेल्या ग्रामस्थांची प्रशासनाकडे विनंती

Morewadi In Satara Taluka

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पश्चिम‌ भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. या पावसामुळे सातारा तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडून काही भाग खचला आहे. यामुळे या गावातील ग्रामस्थांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली असून आमचा जीव गेल्यावर पुनर्वसन करू नका,” … Read more

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात BBA एव्हिएशन मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरु : कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के

Prof. Dr. Digambar Shirke

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठामध्ये BBA एव्हिएशन मॅनेजमेंट हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापरिषद व नियामक मंडळाने मान्यता दिलेली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून हा अभ्यासक्रम सुरु होत आहे. विमानसेवा क्षेत्राच्या विस्तारामुळे विमानचालन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा फायदा ग्रामीण भागातील युवक-युवतींना झाला पाहिजे. BBA … Read more

पालकमंत्री देसाईंनी घेतला सातारा जिल्ह्यातील स्थितीचा आढावा; यंत्रणांना दिले सर्तकतेचे निर्देश

Shambhuraj Desai 2

कराड प्रतिनिधी | हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकताच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच सातारा जिल्ह्यातील परिस्थतीचा त्यांच्याकडून आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्हृयाकडे लक्ष असून पावसाळी स्थितीत आवश्यक त्या सर्व उपाय योजनांसाठी निधी कमी पडु देणार नाही. निवारा शेडमध्ये असणाऱ्या ग्रामस्थांना … Read more

धोम – बलकवडीतून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

Dhom Balakwadi Dam

सातारा प्रतिनिधी | हवामान विभागाकडून कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, सातारा जिह्यातील धोम-बलकवडी धरणाचे तीनही दरवाजे शनिवारी सायंकाळी सहा वाजता अर्धा मीटर उघडण्यात आले. आता धरणातून 870 व वीजगृहातून 330 असा एकूण 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला … Read more

साताऱ्याचे जवान विजय कोकरे यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Satara Jawan Vijay Kokre

कराड प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील सांडवली (वारसवाडी) येथील जवान विजय रामचंद्र कोकरे यांचे गुरुवारी श्रीनगर येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव शनिवारी मुंबईत आणण्यात आले. तसेच त्यांच्या पार्थिवावर टागोरनगर (विक्रोळी, मुंबई) येथे शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्याचे जवान विजय कोकरे यांचे गुरुवारी … Read more