सातारच्या जवानाचे लखनऊमध्ये निधन

Jawan Praveen Kumar Suresh Ingle News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील जवान प्रवीणकुमार सुरेश इंगळे (वय ४०) यांचे लखनऊ येथे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ असल्याने तेथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्य झाला. जवान इंगळे यांच्या निधनाची बातमी समजताच खटाव ताललुक्यासह शिरसवडी गावावर शोककळा पसरली आहे. खटाव तालुक्यातील जवान प्रवीणकुमार इंगळे हे गेली २२ वर्षे … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटात पुन्हा खोळंबली 4 तास वाहतूक

Khabataki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खंबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळ ट्रक बंद पडल्यामुळे सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक तब्बल ४ तास खोळंबली होती. एक माल ट्रक गुरुवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटातील सहाव्या वळणावरून दत्त मंदिर परिसरातून निघाला होता. … Read more

उसने दिलेले पैसे मागितले; ‘नाही’ म्हणाला म्हणून ‘त्यानं’ भोकसलं; घटनेमुळं पाटण हादरलं

Patan Crime News jpg

पाटण प्रतिनिधी । उसने दिलेले 5 हजार रुपये परत न दिल्याच्या रागातून तरुणाने चाकूने भोसकून एकाचा खून केल्याची घटना पाटण तालुक्यातील जाळगेवाडी हद्दीत गुरूवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पंडित बाबुराव चव्हाण (वय 52, रा. कडववाडी, ता. पाटण) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अनिकेत मारूती … Read more

मराठी पाट्या लावा, अन्यथा खळखट्याक करू; मनसेचा आंदोलनाचा इशारा

Karad MNS News jpg

कराड प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कराड शहरासह तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजी भाषेत पाट्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. ८ दिवसांत इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावाव्यात अन्यथा मनसे स्टाइलने खळखटयाक आंदोलन करू, असा इशारा कराड येथील मनसे नेत्यांच्या वतीने कराडचे तहसीलदार विजय पवार यांना निवेदनाद्वारे नुकताच देण्यात … Read more

पुणे-बंगळुरू महामार्गावर एकमेकांना खुन्नस देत नचवल्या तलवारी; पुढं घडलं असं काही…

Crime Satara News 20231201 110306 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात रात्रीच्यावेळी उशिरापर्यंत डीजेच्या ठेक्यावर रस्त्यावर तरुण नव्हतं असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, यावेळी अनुचित प्रकार देखील घडत आहेत. अशीच धक्कादायक घटना गुरुवारी रात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर सातारा येथे घडली. गुरुवारी रात्री डीजेच्या दणदणाटात गौरीशंकर कॉलेज परिसरात व्यावसायिकांसह दोन गट आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटाकडून एकमेकांना खुन्नस देत तलवारी नाचवण्यात आल्या. … Read more

सालपे खून प्रकरणी दोघांना जन्मठेप अन् 10 हजाराचा दंड

Crime News 20231201 092608 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सालपे, ता. फलटण येथील बसस्थानक परिसरात सुमारे दोन वर्षापूर्वी एकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील दोघा आरोपींना सत्र न्यायालयाने जन्मठेप व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सालपे येथे दि ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लोणंद- सातारा रस्त्यावरील … Read more

पुणे-बंगळुरू महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ मार्गावर आज रास्ता रोको

Pune-Bangalore Highway Khambataki Tunnel News

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्याहून सातारा बाजूकडे अथवा महाबळेश्वरला जाण्याचा विचार असेल तर थांबा. कारण आज शुक्रवारी दि. १ डिसेंबर रोजी खंबाटकी घाट मार्गावर धनगर समाजाच्यावतीने रस्ता रोकोचा इशारा देण्यात आला आहे. धनगर समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांकरीता लोणंद येथे आमरण उपोषणास बसलेल्या आंदोलकांना समर्थन देण्यासाठी खंबाटकी घाटामध्ये शुक्रवारी … Read more

मराठा आरक्षणाबाबत ‘उपरा’कार लक्ष्मण मानेंचं मोठं विधान; म्हणाले की…

20231128 161514 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मराठा आरक्षणाला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे. ओबीसी समाजाला ज्या सवलती मिळतात, त्या मराठा समाजालाही मिळाल्या पाहिजेत. हवे तर त्यांच्यात अ आणि ब असे गट बनवा. त्यासाठी केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा उठवून पन्नास टक्क्यांपुढे न्यावी. पंतप्रधानांनी यासंदर्भात संसदेत विधेयक मांडून मंजूर करून घेतले पाहिजे. जनतेचे सर्वोच्च सभागृह संसदेने पारित केलेला कायदा सर्वोच्च … Read more

कास धरणामुळे सातारकरांचा काय फायदा होणार?; खा. उदयनराजेंनी दिलं ‘हे’ उत्तर

Satara News 20231128 141154 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पुढील पन्नास वर्षांचा विचार करून कास धरणाची उंची वाढविण्यात आली आहे. धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून या धरणामुळे शहराच्या विकासाचा वेग निश्चितच वाढेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, दुसऱ्या … Read more

Big Boss फेम अभिजित बिचुकलेला RPI कार्यकर्त्यांनी घातला दुग्धाभिषेक; नेमकं कारण काय?

Satara News 20231128 135129 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 28 मे 2023 रोजी संसदेच्या नवीन वास्तूचं उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण देशासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. दरम्यान, नव्या संसदेला काय नाव द्यायच? यावरुन देशभरात चर्चा सुरु असताना साताऱ्यात प्रसिद्ध अभिनेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा यांनी डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली. त्यावरून बीचुकले यांना … Read more

कराडच्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात लांब लचक ग्रेडेन अन् कमी उंचीची शिजू डॉग…

Karad News 20231127 190453 0000 jpg

कराड प्रतिनिधी | स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या १८ व्या राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनास थाटात प्रारंभ झाला आहे. दरम्यान यंदा प्रदर्शन अजून एक दिवस वाढवण्यात आलेले आहे. प्रदर्शनात चौथ्या दिवशी फळे, फुले आणि श्वान स्पर्धा घेण्यात आली. यावेळी स्पर्धेत दाखल झालेल्या श्वानांनी सर्वांचे लक्ष … Read more

आईवरून शिवी दिली म्हणून त्याचा कायमचाच केला बंदोबस्त; दोघा जणांना अटक

Crime News 20231127 141923 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भुईंज येथील हमालाच्या खुनाचे गुढ उकलले असून आईवरून शिव्या दिल्यामुळे दोघांनी त्याचा काटा काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अनिल नामदेव कुचेकर (वय 35, रा. मातंगवस्ती भुईज) याचा अज्ञातांनी दांडक्याने व दगडाने ठेचून खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी रोहित … Read more