कराड प्रतिनिधी । कराड येथील कार्वेनाका परिसरात भरदिवसा युवकावर एकाने चाकूने सपासप वार केल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला असून हल्लेखोर संशयित घटना स्थळावरून पसार झाले आहेत.
शुभम रविंद्र चव्हाण (वय 22, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कराड येथील कार्वे नाका परिसरात शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वडोली निळेश्वर येथील राहणार शुभम चव्हाण हा उभा होता. यावेळी त्याच्याजवळ एक व्यक्ती आला. त्याने त्याच्याकडे असलेल्या चाकूने शुभमवर हल्ला केला. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर संबंधित हल्लेखोर त्या ठिकाणाहून पसार झाला. अचानक घडलेल्या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडून गेला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या काही नागरिकांनी शुभमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
कार्वे नाका येथेर युवकावर हल्ला झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवशी, गुन्हेप्रकटीकरण शाखेचे पोलीस उपरिक्षक राजू डांगे याच्यासह कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या घटनेची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. तसेच संशयित हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. संबंधित युवकावर कोणत्या उद्देश्याने हल्ला करण्यात आला? या मागचे कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे.