पाटण प्रतिनिधी । उसने दिलेले 5 हजार रुपये परत न दिल्याच्या रागातून तरुणाने चाकूने भोसकून एकाचा खून केल्याची घटना पाटण तालुक्यातील जाळगेवाडी हद्दीत गुरूवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पंडित बाबुराव चव्हाण (वय 52, रा. कडववाडी, ता. पाटण) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अनिकेत मारूती जगदाळे (वय 25, रा. जागळेवाडी, ता. पाटण) असे खून करणाऱ्या संशयितचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कडववाडी येथील राहणाऱ्या पंडित चव्हाण यांनी जागळेवाडी येथील तरुण अनिकेत याच्याकडून 5 हजार रुपये काही कारणासाठी उसणे घेतले होते. दरम्यान, आपल्याकडून घेतलेले उसने पैसे परत मागण्यासाठी अनिकेत हा गुरूवारी रात्री पंडित चव्हाण यांच्याकडे गेला. यावेळी अनिकेतने पंडित यांना पैसे मागितले.
त्यावेळी पंडित यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने अनिकेतने मारहाण केली. या मारहाणीत पंडित यांचा मृत्यू झाला. या घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. यावेळी माहिती मिळालेल्यानंतर मल्हारपेठ पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीसांकडून केला जात आहे.