सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात काल अटक केलेल्या एका आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायाधीशांना भेटवून परत पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना दोन पोलीस शिपायांच्या तावडीतून दुचाकी चोरटा पळून गेला. हा प्रकार शनिवारी घडल्यानंतर पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांची तपास पथके वेगवेगळ्या दिशेला चोरट्याला पकडण्यासाठी पाठविण्यात आली आहेत.
सुरज हनुमंत साळुंखे (वय 23 रा. सावली जि. सातारा ) हा घरपोडीतील आरोपी शाहुपुरी पोलिसांनी पकडला होता. त्यास शनिवारी सातारा येथील न्यायालयात दोघे पोलीस शिपाई घेऊन गेले होते. न्यायालयात भेटवून आणल्यानंतर ते पुन्हा शाहूपुरी पोलीस स्टेशन कडे येत असताना पोलिसांच्या हातातून सुरज साळुंखे याने पलायन केले.
सुरज साळुंखे हा साताऱ्यातील घरफोड्या करणारा आरोपी असून त्याच्या नावावर अनेक घरफोड्या केल्याचे गुन्हे दाखल आहेत. शाहूपुरी पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस पथके तपासासाठी रवाना झाली आहेत.