कोयना धरणाचे वक्री दरवाजे आज उघडणार; ‘इतका’ TMC झालाय पाणीसाठा

0
90
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणार्‍या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे सर्व सहा वक्री दरवाजे आज मंगळवारी सकाळी 11 वाजता उघडले जाणार आहेत. दरवाजे एक फूट सहा इंचांनी उचलले जाणार असून, कोयना नदीत प्रतिसेकंद 5 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.धरणात सध्या 75.48 TMC इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील कृष्णा व कोयना नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

यावर्षी मे महिन्यापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात दरवर्षीच्या तुलनेत जादा पाणीसाठा झाला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणात 75.48 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. धरण 71.71 टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमीच आहे.

मात्र, असे असले तरी धरणाच्या शिवसागर जलाशयातील सद्यस्थितीतील पाणीसाठा, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस, धरणात होणारी पाण्याची आवक आणि उर्वरित मान्सून कालावधी विचारात घेत पाणीसाठा नियंत्रित करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे.

Koyna Dam
Date: 15/07/2025, 8:00 AM
Water level: 2136’01”
(651.078m)

Gross Storage: 75.48 TMC (71.71%)

Inflow : 15,819 Cusecs.
(1.36 TMC)

Discharges-
KDPH : 2100 Cusecs.

Rainfall in mm-
(Daily/Cumulative)
Koyna- 103/2330
Navaja- 134/2202
Mahabaleshwar- 92/2218