पाटण प्रतिनिधी । राज्यासह सातारा जिल्ह्यात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. आज दिवसभरात पाटण तालुक्यात पावसाने कमी हजेरी लावली. कोयना धरणात 69.04 TMC इतका पाणीसाठा झाला असून धरण 65.60 टक्के भरलं आहे. पावसाची स्थिती पाहता हवामान विभागाने आज आणि उद्या सातारा जिल्ह्यास ‘ऑरेंज अलर्ट’ दिलेला आहे. कोयना धरणातून 2100 क्युसेक पाणी सोडले जात असल्यामुळे कोयना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी काल रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास धरण पायथा विद्युतगृहाचे दुसरे युनिट सुरू करून 1050 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला होता. दरम्यान, आज सरासरी प्रतिसेकंद 23 हजार 415 क्यूसेक्स पाण्याची आवक कोयना धरणात सायंकाळी पाच वाजेपर्यंत होत होती.
परिणामी कोयना धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. सध्या कोयना धरणातील पाणी उंची समुद्रसपाटीपासून 2128’10” तर जलपातळी 648.868 मीटर इतकी आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोयनेला 17 मिलीमीटर पाऊस पडला. तर नवजाला 24 आणि महाबळेश्वरला सर्वाधिक 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Koyna Dam
Date: 07/07/2025, 5:00 PM
Water level: 2128’10”
(648.868m)
Gross Storage: 69.04 TMC (65.60%)
Inflow : 23,415 Cusecs.
(2.02 TMC)
Discharges-
KDPH : 2100 Cusecs.
Rainfall in mm-
(Daily/Cumulative)
Koyna- 17/2043
Navaja- 24/1844
Mahabaleshwar- 27/1925