कोयना धरण भरलं ‘इतके’ TMC; उरमोडीतूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग

0
2349
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने मोठी मजल मारली आहे. अजूनही कोयना धारण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत कोयनानगरला तब्बल १ हजार ५५१ तर महाबळेश्वरला १ हजार ४५३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तसेच धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. कोयनेत तर ५३.६९ टीएमसी साठा झाला आहे. कोयना धारण अर्धे भरले असून उरमोडी धरणाच्या वक्र दरवाजातूनही विसर्ग सुरू करण्यात आले आहे.

मागील १५ दिवसांपासून पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात संततधारसारखा पाऊस पडत आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही अवघड झालेले आहे. तसेच या पावसामुळेच ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत. त्यातच पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी यासारख्या प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस होत आहे. विशेष करुन कोयना धरणक्षेत्रात पावसाचा जोर आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८७ मिलिमीटर पाऊस झाला. तर नवजा येथे ६१ आणि महाबळेश्वरला ७७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला १ हजार ५५१, महाबळेश्वरला १ हजार ४५३ आणि नवजाला १ हजार ३२४ मिलिमीटर पाऊस पडला. तर कोयना धरणक्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने आवकही टिकून आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात २९ हजार ७९३ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ५१.०१ टक्के टीएमसी पाणीसाठा झाला होता.

Koyna Dam

Date: 01/07/2025
Time: 08:00 AM
Water Level: 2111’05” (643.560m)
Water Storage: 53.69 TMC (51.01%)
Inflow: – 29,793 cusecs (2.57 TMC)
1050 cusecs discharge from Piththa Graha into Koyna riverbed
Rainfall min min (today/total)
Koyna 87/1551
Navaja 61/1324
Mahabaleshwar 77/1453