कोयना धरणात 40.94 TMC पाणीसाठा; कण्हेर, उरमोडीतून विसर्ग

0
341
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहिला. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नवजा, कोयनानगर व महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणात २१ हजार क्युसेक आवक होत असल्याने चोवीस तासात अडीच टीएमसीने साठा वाढला आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणात ४०.९४ टीएमसी पाणीसाठा झाला तर पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रासाठी आजपासून दि. २९ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून पुढील चार दिवस हे अतिवृष्टीचे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. दरम्यान, कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाने हजार मिलिमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी प्रतिसेकंद 31 हजार 252 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरण पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून एका जनीत्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 1050 क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत नवजा येथे सर्वाधिक १ हजार ५२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. यानंतर महाबळेश्वरला १ हजार ९२ आणि कोयना येथे १ हजार ८४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे ओढे भरुन वाहत असून तलवांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढू लागला आहे.

कण्हेर उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

कण्हेर आणि उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पाऊस व धरणामध्ये पाण्याची आवक होत आहे. यामुळे कण्हेर धरण व्यवस्थापनाने मंगळवारी सायंकाळी ७:३० वाजता सांडव्यावरील विसर्गात १००० क्युसेकने विसर्गात वाढ करून वेण्णा नदी पात्रात ४ हजार क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वेण्णा नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कास तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पाऊस सुरूच असल्याने व धरणामध्ये येणारा येवा लक्षात घेता, उरमोडी धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मंगळवारी दुपारी १२ पासून जलविद्युत प्रकल्पातून उरमोडी नदीपात्रात पाचशे क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. वेण्णा नदीवरील पुलांवरून पाणी जाण्याची शक्यता कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे या नदीवरील पुलावर असलेल्या हामदाबाज-किडगाव आणि करंजे-म्हसवे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. गावांचा संंपर्क तुटला आहे. प्रशासनाने नागरिकांना या पुलाऐवजी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, अशा सूचना केल्या आहेत.

Koyna Dam
Date : 25/06/2025, 5:00 PM
Water level : 2099’00”
(639.775m)

Gross Storage : 43.09 TMC (40.94%)

Inflow : 25,922 Cusecs.
(2.23 TMC)

Discharges-
KDPH : 1050 Cusecs.

Rainfall in mm-
(Daily/Cumulative)
Koyna- 22/1084
Navaja-13/1052
Mahabaleshwar- 54/1092