सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील पोलिसांनी एका दुचाकी चोरीला अटक केल्यानंतर, त्याच्याकडून आणखी दोन चोरी केलेल्या दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, युवराज आकोबा निकम (वय ५६, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) हा संशयित वाढे फाटा येथून दुचाकीवरून जात असताना पोलिसांच्या नजरेत आला. त्याच्या दुचाकीला नंबरप्लेट नव्हती, त्यामुळे त्याला थांबवून चौकशी केली गेली. चौकशीनंतर दुचाकी चोरीचा प्रकार केला असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्याकडून तीन दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक निरीक्षक श्याम काळे, उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार नीलेश यादव, सुजित भोसले, नीलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम हे या कारवाईत सहभागी होते.