सातारा प्रतिनिधी | पाचगणी येथील हिल स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये बार डान्सरचे नृत्य सुरु असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीची आधारे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत महिला अश्लील नृत्य करताना आढळल्यानंतर तब्बल 21 जणांना अटक करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील भिलार येथील हॉटेल हिराबागचा मालक आरोपींमध्ये असल्याने गुन्हांही दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हॉटेलमध्ये महिला बार डान्सर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. काही 12 महिला, गायक आणि वेट्रेसच्या वेषात, कमी कपडे परिधान करून सुमारे 20 ग्राहकांसमोर अश्लील नृत्य करत होत्या.
25 लाखांहून अधिक किमतीची संगीत उपकरणे, मोबाईल फोन आणि एक कार जप्त करण्यात आली. या महिला कोठून आणल्या याचा तपास सुरू असून समुपदेशनानंतर या महिलांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.