पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात दोन दिवस पावसाचा जोर मंदावला होता. तरी धरणाची पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारी धरणाचे सहा वक्री दरवाजे सात फुटांवरून नऊ फूट उचलण्यात आले असून विसर्ग वाढवण्यात आला आहे. दरम्यान, धरणात 85.59 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. पावसामुळे धरण 81.32 टक्के भरले असून धरणात 42 हजार 787 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातून 42 हजार 100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.
Koyna Dam
Date: 31/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2147’05” (654.533m)
Dam Storage :
Gross: 85.59 TMC (81.32%)
Live: 80.47 TMC (80.36%)
Inflow : 42,787 Cusecs.
Discharges
Radial Gate: 40,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 42,100 Cusecs
Rainfall in mm- (Daily/Cumulative)
Koyna- 92/3675
Navaja- 158/4312
Mahabaleshwar- 101/4014