सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाचा जोर मंदावला असून, शनिवारी दिवसभर उघडझाप होती. मात्र, धरणात पाण्याची आवक होत असल्याने जिल्ह्यातील कोयना धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. तर अनेक ठिकाणी घरे पडली आहेत. तसेच दोन वन्यप्राण्यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठाही 84.03 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.
सातारा जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याखाली गेलेले रस्ते, पूल खुले होऊ लागले आहेत. त्यातच मागील सहा दिवसांतील जोरदार पावसामुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. रविवार सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 84.03 टीएमसी पाणीसाठा झाला होता. 79.84 टक्के धरण भरले आहे.
कोयना धरणातील विसर्ग जैसे थे आहे. सहा दरवाजातून ३० हजार, तर पायथा वीजगृहाच्या दोन्ही युनिटमधून २ हजार १०० असा एकूण ३२ हजार १०० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे कोयना नदीची पाणीपातळी वाढलेलीच आहे. तर सायंकाळी पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगर येथे 57, तर नवजाला 89 आणि महाबळेश्वर येथे 105 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
Koyna Dam
Date: 28/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2145’08” (653.999m)
Dam Storage:
Gross: 84.03 TMC (79.84%)
Live: 78.91 TMC (78.81%)
Inflow : 39,641 Cusecs.
Discharges
Radial Gate: 30,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 32,100 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 57/3405
Navaja- 89/3988
Mahabaleshwar- 105/3662