कोयना धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; 75.77 TMC झाला पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा जोर वाढला असल्यामुळे धरणाच्या जलाशयात दररोज एक ते दोन टीएमसीने भर पडत आहे. मुसळधार पावसामुळे धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरणातील पाण्याची आवक प्रतिसेंकद 20 हजार 106 क्युसेस अशी सुरू आहे. तर धरणात सध्या 75.77 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. जलाशयाचा एकूण पाणीसाठा 71.99 टक्के धरण भरले आहे. आज दुपारी निरा देवघर प्रकल्पाच्या विदुयतगृहातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये करण्यात येणार आहे.

कोयना धरण क्षेत्रात बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 75.77 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तसेच गेल्या 24 तासात कोयनेला – 96 मिलीमीटर, नवजा- 109 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 92 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला – 2 हजार 923, नवजा – 4 हजार 160 आणि महाबळेश्वरला – 3 हजार 849 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयना धरणातून 2100 क्युसेस इतक्या क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

निरा देवघर प्रकल्पाच्या विदुयतगृहातून 750 क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये

निरा देवघर धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दुपारी 2 वाजता निरा देवघर धरणाच्या विदुयतगृहद्वारे 750 क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल होऊ शकतो. त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. तसेच योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील, असे आवाहन निरा पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता यांनी केले आहे.

कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –

Koyna Dam
Date : 02/08/2023
Time : 08:00 AM
Water level : 2136′ 05″ (651.180m)

Dam Storage:
Gross : 75.77 TMC (71.99%)

Inflow : 20,106 cusecs

Discharges
KDPH : 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River : 2100 Cusecs

Rainfall in mm : (Daily/Cumulative)
Koyna : 96/2923
Navaja : 109/4160
Mahabaleshwar : 92/3849

कराड पाटण तालुक्यातील महत्वाच्या पुल परिसरातील पाणीपातळी पहा

1) कोयना जुना पूल (कराड)
पाणी पातळी – 555.867(19ʼ03″) इशारा (45ʼ) (धोका – 58ʼ4ʼʼ)

2) वारुंजी
पाणी पातळी – 554.927 (18’0″) विसर्ग (13328 क्युसेक) (इशारा – 43’10”) (धोका – 51ʼ8″)

3) हेळवाक पुल
पाणी पातळी – 574.30 मी. (ईशारा 576.80 मी.) (धाेका 578.60 मी)

4) केरा पुल पाटण
पाणी पातळी – 567.30 मी. (ईशारा 570.45 मी.) (धाेका 572.97 मी.)