मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 68.82 TMC पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोयना धरणात सुद्धा पाण्याची झपाट्याने वाढ होत असून आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार धरणाने 60 टीमसीचा टप्पा ओलांडला असून कोयना धरणाचा पाणीसाठा 68.82 टीएमसी झाला आहे.

दरम्यान, कोयनेला 162 तर नवजा येथे 157 मिलीमीटर आणि महाबळेश्वरला 157 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक झाल्यामुळे काल मंगळवारी पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.

एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 2 हजार 894 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 3 हजार 385 आणि महाबळेश्वरमध्ये 2 हजार 801 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात आवक वाढली असून बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारापर्यंत 49 हजार 452 क्यूसेक वेगाने पाणी येत होते.

Koyna Dam

Date: 24/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2128’07” (648.792m)

Dam Storage:
Gross: 68.82 TMC (65.39%)
Live: 63.70 TMC (63.62%)

Inflow : 49,452 Cusecs.

Discharges
KDPH: 1050 Cusecs.
Total Discharge in koyna River: 1050 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 162/2894
Navaja- 157/3385
Mahabaleshwar- 157/2801