पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तरीही धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्गात २० हजार क्यूसेकपर्यंत वाढ होणार आहे. यावेळी एक घटना घडली त्यामुळे धरणाचे दरवाजे उडण्यास एक तास उशीर झाला. मुसळधार पावसामुळे सायं. 7 वाजता आणखी विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
कोयना धरण क्षेत्रात पावसाबरोबर वाऱ्याचाही जोर असल्यामुळे धक्क्याच्या ठिकाणी बांधून ठेवलेली गृह विभागाची बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सुटून धरणाच्या दरवाज्याजवळ आल्यामुळे दरवाजे उघडण्यास अडचणी आल्या. आणि दरवाजे पाच वाजण्याच्या सुमारास उचलण्यात आले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे सायंकाळी पाच वाजता आलेल्या आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा 78.29 टीएमसी झाला आहे. तर धरण 74.38 टक्के भरले असून धरणात 85 हजार 937 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाच दिवसांपासून संततधार सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू करून १ हजार ५० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता. तर आज कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यावेळचे व्हिडिओ चित्रीकरण कोयनानगर येथील वैभव देशमुख यांनी केले आहे.
जिल्ह्यात सरासरी 53.4 मि.मी. पाऊस
सातारा दि. 25 (जि.मा.का.) – जिल्ह्यात दि. 24 जुलै रोजी सरासरी 53.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 592.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 47.9 (520.4), जावली-मेढा – 139.5 (1011.1), पाटण – 58.6 (900.4), कराड –30.5 (556.2), कोरेगाव –57.6 (437.4), खटाव – वडूज – 26.7 (348.0), माण – दहिवडी – 14.8 (275.6), फलटण – 13.3 (299.6), खंडाळा – 32.8 (228.6), वाई – 59.9 (515.5), महाबळेश्वर – 219.3 (2064.2) या प्रमाणे पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा
सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 108.68 अब्ज घन फूट (टिएमसी)पाणी साठा झाला आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे.
मोठे प्रकल्प : कोयना – 75.27 (71.51), धोम – 8.00 (59.26), धोम – बलकवडी – 2.54 (62.25), कण्हेर – 7.88 (78.02), उरमोडी – 5.39 (54.12), तारळी – 4.57 (78.12).
मध्यम प्रकल्प : येरळवाडी – 0.76 (66.26), नेर – 0.07 (16.81), राणंद – 0.03 (9.96), आंधळी – 0.12 (35.32), नागेवाडी- 0.08 (36.16), मोरणा – 1.0 (75.14), उत्तरमांड – 0.62 (70.57), महू – 0.89 (81.23), हातगेघर – 0.13 (50.04), वांग (मराठवाडी) – 2.13 (77.91) या प्रमाणे पाणीसाठा आहे.
Koyna Dam
Date: 25/07/2024
Time: 05:00 PM
Water level: 2139’03” (652.043m)
Dam Storage:
Gross: 78.29 TMC (74.38%)
Live: 73.17 TMC (73.07%)
Inflow : 85,937 Cusecs.
Discharges
Radial Gate: 10,000 Cusecs.
KDPH: 1050 Cusecs.
Total Discharge in koyna River: 11,050 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 90/3147
Navaja- 70/3692
Mahabaleshwar- 77/3185