पाटण प्रतिनिधी | भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी उद्या शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ करुन तो आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता 50 हजार क्युसेक करण्यात आला आहे.
आज कोयना धरणात 86.63 टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून धरण 82.31 टक्के भरले आहे. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणामध्ये 24 तासांत 2 टीएमसी पाणी वाढले आहे. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सांडव्यातील विसर्गात वाढ करून ५० हजार क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आलेला आहे. तसेच वेळे लनुसार त्यामध्ये वाढ केली जाणार आहे.
दरम्यान, आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता कोयनानगरला ९६, नवजाला १३१ व महाबळेश्वर येथे १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ५२ हजार १०० क्युसेक्स इतका झाला आहे. कोयना/कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Koyna Dam
Date: 02/08/2024
Time: 08:00 AM
Water level: 2148’07” (654.888m)
Dam Storage :
Gross: 86.63 TMC (82.31%)
Live: 81.51 TMC (81.40%)
Inflow : 52,834 Cusecs.
Discharges
Radial Gate: 40,000 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 42,100 Cusecs
Rainfall in mm – (Daily/Cumulative)
Koyna- 96/3859
Navaja- 131/4567
Mahabaleshwar- 135/4233