कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 3 फूट 6 इंचाने उचलले; नदीपात्रात एकूण 11,400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु

0
212
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | संतोष गुरव
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे आज बुधवारी पुन्हा दुपारी 12 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 6 इंचांवरून 3 फुट 6 इंचाने उघडण्यात आले. तसेच कोयना नदीपात्रात 9300 क्युसेक तरच नेहमीच 2100 असा एकूण 11,400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सध्या कोयना धरणात 77.26 TMC इतका पाणीसाठी झाला असून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यावर्षी मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली तो अद्यापही कायम राहिला आहे. मागील चार-पाच दिवसांत पावसाचा जोर कमी झाला होता; मात्र सोमवारपासून तो पुन्हा वाढला आहे. यावर्षी 15 जुलैपासूनच धरणातून विनावापर पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. तर आज प्रत्यक्ष धरणातून पाण्याचा अतिरिक्त विसर्ग करण्यात आला आहे.

गेली चार दिवस पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. त्यामुळे कोयना, कृष्णा नद्यांची पाणीपातळी घटली होती. मात्र, सोमवारी पावसाचा जोर आणि धरणातील पाण्याची आवकही वाढली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 75 टीएमसी झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १ फूट ६ इंच उघडून सांडव्यावरून ३४०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला. पावसाचे अजून अडीच महिने बाकी आहेत. कोयना धरणाचे तांत्रिक वर्ष (1 जून) सुरू झाल्यापासून आजअखेर कोयनानगरला सर्वाधिक 2374 मिलीमीटर, महाबळेश्वरला 2349 आणि नवजाला 2286 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातील दोन्ही युनिटमधून 2100 क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

Koyna Dam

Date: 16/07/2025, 8:00 AM
Water level: 2138’01”
(651.688m)

Gross Storage : 77.26 TMC (73.41%)

Inflow : 26,408 Cusecs.
(2.28 TMC)

Discharges-
KDPH : 2100 Cusecs.
Radial Gate: 3400 Cusecs.
Total Discharge: 5500 Cusecs.

Rainfall in mm-
(Daily/Cumulative)
Koyna- 44/2374
Navaja- 84/2286
Mahabaleshwar- 131/2349