पाटण प्रतिनिधी | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असून २४ तासांत महाबळेश्वरला ११४ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक वाढल्याने मध्यरात्रीच्या सुमारासच दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास कोयना धरण दुसऱ्यांदा पूर्ण भरले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १० तर नवजाला २७ आणि महाबळेश्वरमध्ये ५७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तसेच धरण क्षेत्रातही पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास कोयनेत २३ हजार ५३१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर सकाळी धरणात १०५.२५ टीएमसी साठा झाल्याने १०० टक्के भरलेले आहे.
माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. यामुळे ओढे भरुन वाहत आहेत. तलवांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढू लागला आहे. तरीही या पावसाचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसू लागलाय. काढणीच्या वेळीच पाऊस होत असल्याने नुकसान पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातही पाऊस वाढला आहे. तर पश्चिमेकडेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या सहा प्रकल्पात एकूण १४८ टीएमसीवर पाणीसाठा होतो. हे सर्व धरणे भरली आहेत.
Koyna Dam
Date: 28/09/2024
Time: 08:00 AM
Water level: 2163’06” (659.435m)
Dam Storage :
Gross: 105.25 TMC (100%)
Live: 100.13 TMC (100%)
Inflow : 23,531 Cusecs.
Discharges
Radial Gate: 19,096 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 21,196 Cusecs
Rainfall in mm- (Daily/Cumulative)
Koyna- 10/5528
Navaja- 27/6783
Mahabaleshwar- 57/6462