105.25 TMC क्षमतेच कोयना धरण भरलं ‘इतके’ टक्के

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळत असून या पावसामुळे धरणाच्या जलाशयातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा 81.71 TMC इतका झाला असून सुमारे 77.63 टक्के इतक्या क्षमतेने धरण भरले आहे.

कोयना जलाशयात दिवसभरात प्रतिसेकंद 10 हजार 722 क्युसेक पाण्याची आवक झाली असून पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. दिवसभरात कोयनेला – 06 मिलीमीटर, नवजा- 08 मिलीमीटर व महाबळेश्वरला – 08 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला – 3 हजार 106, नवजा – 4 हजार 415 आणि महाबळेश्वरला – 4 हजार 75 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी हि 2143′ 0 (653.212m) इतकी झाली आहे.

मागील सव्वा महिन्यापासून जिह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी आदी प्रमुख धरणांत 70 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झालेला आहे.

कोयना धरणात किती पाणी याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी खालील आकडेवारी पहा –

Koyna Dam
Date : 06/08/2023
Time : 05:00 PM
Water level : 2143′ 01″ (653.212m)

Dam Storage :
Gross : 81.71 TMC (77.63%)

Inflow : 10,722 cusecs

Discharges
KDPH : 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River : 2100 Cusecs

Rainfall in mm : (Daily/Cumulative)
Koyna : 06/3106
Navaja : 08/4415
Mahabaleshwar : 08/4075