सातारा जिल्ह्यास आज अन् उद्या ‘हा’ अलर्ट; मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 102.76 TMC पाणीसाठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात सोमवार आणि मंगळवारी पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. मंगळवारी सायंकाळनंतर पाटणसह कराड तालुक्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढले असून हवामान विभागाने सातारा जिल्ह्यास दोन दिवस येलो अलर्ट दिलेला आहे. दरम्यान, कोयना धरणात 102.76 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 97.63 टक्के भरलं आहे.

जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, तापोळा, बामणोली, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात दाणादाण उडाली होती. लोकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले होते. जवळपास १२ दिवस धो-धो पाऊस पडत होता. यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळीसह उरमोडी या प्रमुख धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढला. जुलै महिना संपताना या प्रमुख धरणांतील पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहोचला होता. तसेच ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतरही काही दिवस पावसाचे प्रमाण चांगले राहिले.

दरम्यान, आता परतीचा पाऊस पुन्हा सुरु झाला असून राज्यात काही जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्टचा इशारा दिलेला आहे. सातारा जिल्ह्यास देखील येलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला असून आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात 1 हजार 253 क्युसेक पाण्याची आवक होऊ लागली आहे.

Koyna Dam

Date: 25/09/2024
Time: 08:00 AM
Water level: 2161’07” (658.851m)

Dam Storage:
Gross: 102.76 TMC (97.63%)
Live: 97.64 TMC (97.51%)

Inflow : 1,253 Cusecs.

Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 00 Cusecs.

Total Discharge in koyna River: 00 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 05/5353
Navaja- 05/6543
Mahabaleshwar- 10/6214