विजयनगरमध्ये लाकडी दांडक्याच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू; कराड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील विजयनगर येथे शनिवारी घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण बर्गे (रा. खराडे, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेकी माहिती अशी की, कराड तालुक्यातील विजयनगर येथे शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जणांनी एका युवकास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेले युवकाचा रात्री उशिरा मृत्यू झाला.

करण बर्गे (रा. खराडे, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांकडून कराड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. युवकाला मारहाण करून मारेकर्‍यांनी घटना स्थळावरून पलायन केले आहे. त्यांच्या शोधासाठी कराड शहर पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. घटनास्थळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, पोलीस उपनिरीक्षक अझरुद्दीन शेख यांच्यासह कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पतंग पाटील व कर्मचाऱ्यांनी भेट दिली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.