सातारा प्रतिनिधी | वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथे भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. प्रवीण बाळासाहेब जाधव (वय ३६, रा. ढवळ, ता. फलटण) असे मृताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, की वाठार फाटा ते पुसेगाव रस्त्यावर रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कारने (एमएच १४ एचडब्ल्यू ६३२१) उसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक केले. यात समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच ११ सीएम ६२८८) धडक दिली.
यात दुचाकीस्वार प्रवीण जाधव गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संतोष मोहन जाधव (वय ३८) याला फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास फलटण ग्रामीण पोलिस करत आहेत.