सातारा प्रतिनिधी । गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यात पश्चिमेकडील भागात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याच पाहायला मिळाले आहे. मुसळधार पावसामुळे शेती पिकांना फटका बसला आहे तर नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अक्षता आज सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट जारो करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देखील खबरदारी घेतली जात आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाॅंधार पाऊस पडतो. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. तसेच भूस्खलन होऊन गावांना धोका निर्माण होतो. आताही मागील आठवड्यात पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. धो-धो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच रस्ते खचले, भूस्खलन झाले. त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली.