सातारा जिल्ह्याला आज यलो अलर्ट; कोयना धरणात पाणीसाठा किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर रात्रीपासून पुन्हा सुरु झाला आहे. तर उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे काल बंद करण्यात आलेले असून आज बुधवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 86.78 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला आहे. आज बुधवारी सकाळी आठ वाजता कोयनानगरला 16, नवजाला 43 तर महाबळेश्वरला 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. त्यामुळे कोयना-कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होवू लागली आहे.

Koyna Dam

Date: 07/08/2024
Time: 08:00 AM
Water level: 2148’09” (654.939m)

Dam Storage :
Gross: 86.78 TMC (82.45%)
Live: 81.66 TMC (81.55%)

Inflow : 10,722 Cusecs.

Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.

Total Discharge in koyna River: 2100 Cusecs

Rainfall in mm- (Daily/Cumulative)
Koyna- 16/4190
Navaja- 43/4910
Mahabaleshwar- 20/4650