ऐन दिवाळीत साताऱ्यासह ‘या’ जिल्ह्याना पावसाचा येलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । कोकण आणि विदर्भातील काही भागांत झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक पावसात भिजले आहे. अश्यात हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने राज्यात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा इशारा दिला असून पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाने पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, परभणी, नांदेड या भागात यलो अलर्ट दिला आहे.

ऐन दिवाळीत कोकणात परतीच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. बुधवारी सायंकाळनंतर रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आता पुन्हा आज गुरुवारी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शेतीमाल उघड्यावर असल्यामुळे या पावासाने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. हवामान विभागाने पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, परभणी, नांदेड या भागात यलो अलर्ट दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पीक मुसळधार पावसामुळे वाहून गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या भागात भात शेतीची कापणी होत असते