लाडकी बहिण योजनेचे पैसे बहिणीच्याच खात्यात जमा : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यामध्ये २८ जुन २०२४ पासून सुरु आहे. या योजनेदरम्यान, चालु महिन्यात दि. ९ ऑक्टोबर रोजी सातारा जिल्हयातील काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांचे मोबाईल क्रमांकावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अनुदान जमा झाल्याचा मेसेज आला. याप्रकरणी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून माहिती घेतली असून हा काही वर्षापूर्वी हा नंबर संबंधित महिला वापरत असल्याने तो तिच्या बँक खात्याशी लिंक होता. आता हा नंबर सरचिटणीस देसाई हे वापर असून तिच्या लिंक झालेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झाल्याचा मॅसेज आला आहे. प्रत्यक्षात देसाई यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेली नाही. हे पैसे महिलेच्या खात्यात जमा झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन (Yashni Nagarajan) यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पत्रकार परिषद घेत म्हयमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे उपस्थित होते.

यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी नागराजन म्हणाल्या, या प्रकरणी चौकशी केली असुन त्यामध्ये नरेश देसाई यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या नारी शक्ती दूत अॅपवर व नवीन पोर्टलवर कोणताही ऑनलाईन अर्ज त्यांचे स्वतःच्या नावाने केलेला नाही. तसेच त्यांचे मोबाईल क्र. ५०९९९ वर फक्त पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेले असुन या मेसेजमधील खाते क्रमांक त्यांचा स्वतःच्या नावाचा नसुन या खाते क्रमांक महिलेच्या नावे असल्याचे दिसून आले.

या महिलेशी संपर्क साधून माहिती घेतली असता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या नारी शक्ती दूत अॅपवर सध्या कुर्ला येथे रहात असलेने मुंबई शहर येथील अंगणवाडी सेविका/मदतनीस यांच्याकडून हा ऑनलाईन फॉर्म भरुन घेतला आहे. फॉर्ममध्ये लग्नानंतरचे नाव, वय, पत्ता, आधार कार्ड यांच्या माहिती नुसार नोंद केलेला आहे. ऑनलाईन फॉर्ममध्ये बँक ऑफ इंडीया या बँकेच्या पासबुक ची नोंद केली आहे. परंतु आधार सिंडींग आयसीआयसीआय बँक खात्याला आहे. तसेच त्या महिलेने सन २०१६ साली झिरो बॅलेन्स वर खाते काढलेले आहे. परंतु वर नमुद घण्ण्धू बँक खातेमध्ये सदर योजनेचे पैसे प्राप्त झालेले आहेत तसेच नरेश देसाई यांचे आयसीआयसीआय बँकेमध्ये गृह कर्ज खाते असुन त्याचा खाते क्रमांक स्वतंत्र आहे. नरेश देसाई यांचे बचत खाते बँकेमध्ये कार्यान्वित नसल्याचे नागराजन यांनी सांगितले.