सातारा प्रतिनिधी | ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने उमेद अंतर्गत महिलाच्या बचत गटांना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे 30 पाझर तलाव देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 30 महिला बचत गटातील महिला या 30 पाझर तलावामध्ये मत्स्य पालन करून आता चांगला फायदा मिळवू शकणार आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून राज्यातील हा पहिला प्रकल्प म्हणाला जातो आहे. या मस्य पालनासाठी त्यांना मत्स्यबीजही पुरवण्यात आले आहेत. या पथदर्शी ठरलेल्या अभिनव उपक्रमामुळे जिल्ह्यातील 30 समुहातील सुमारे 300 महिलांना उपजीविकेची अनोखी संधी या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. या राज्यातल्या अभिनव उपक्रमासाठी 30 पाझर तलावामध्ये सुमारे पाच लाखाहून अधिक मत्स्यबीज सोडण्यात आले आहेत.
एका पाझर तलावातून कटला, रोह अशा माशांच्या प्रजातीतून वर्षाला सुमारे पाच लाखा पर्यंत निव्वळ नफा उत्पन्न अपेक्षित असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सांगितले आहे. या मत्स्य व्यवसायासाठी कातकरी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.