तारळी नदीत बुडाल्‍याने आंबळेतील महिलेचा मृत्‍यू

0
335
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | कपडे धुवायला तारळी नदीवर गेलेल्या महिलेचा नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढून नदीपात्रात वाहण्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी आंबळे (ता. पाटण) येथे घडली. साधना रमेश सावंत (वय ४३, रा. आंबळे, ता. पाटण) असे त्या मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय घाडगे यांनी फिर्याद दिली असून त्यांनी म्हटले आहे की, साधना सावंत या नेहमीप्रमाणे घरातील धुणे धुण्यासाठी तारळी नदीकाठी गेल्या होत्या. बराच वेळ त्या घरी न आल्याने त्यांचे सासरे नदीवर पाहायला गेले. तर त्यांना स्‍नूषा साधना तिथे दिसून आल्या नाहीत. त्यांनी याबाबतची माहिती गावात दिल्यावर शोधाशोध सुरू झाली.

सरपंच रोहित खरात यांनी अक्षयला याची माहिती दिली. नदीकाठावरून शोधत असताना आंबळे पुलापासून तारळे बाजूकडे वाहून तुकाई नावाच्या शिवारानजीक नदीत पाइपला अडकलेला मृतदेह त्‍यास आढळून आला. अक्षय याने अमोघ घाडगे, अक्षय पाटणकर यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. पोलिस व महसूलच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कराड येथे पाठवला. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल श्री. आळंदे करीत आहेत.