प्रीतिसंगम परिसरात महिलेला सर्पदंश; कराडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु

0
96
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत नेहमीच नागरिकांच्या गर्दीने फुललेल्या येथील प्रीतिसंगम बागेत विषारी सापांचा वावर वाढला असल्यामुळे बागेत फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांत सुमारे घोणस या विषारी जातीच्या सापाची ११ पिल्ले सर्पमित्रांनी तेथून पकडली. शनिवारी चार तास सापांसाठी शोधमोहीम राबविन्यात आली. सापाच्या वावरासह सफाईसाठी पालिकेने शनिवार पर्यंत प्रीतिसंगम बाग फिरण्यासाठी बंद ठेवली होती. दरम्यान, आज रविवारी सायंकाळी एक महिलेला प्रीतिसंगम परिसरात सर्प दंश झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर महिलेल तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कराड येथील प्रीतिसंगम बागेत सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यात विषारी घोणस सापही लोकांच्या नजरेस पडला होता. त्याचा काही सर्पमित्रांनी शोध घेतला. मात्र, तो सापडला नव्हता. बागेत दोन ते तीन दिवसांपूर्वी पुन्हा घोणस दिसल्याची माहिती मिळाली. त्यावरून सर्प मित्र बबलू लोहना, अजय महाडिक यांच्यासह काही सर्पमित्र तेथे शोधमोहीम घेत होते. त्यावेळी त्यांनी घोणसच्या तब्बल ११ पिल्लांना पकडून सुरक्षितस्थळी सोडले. तरीही अद्यापही काही साप तेथे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

दरम्यान आज रविवारी सायंकाळी एक महिला प्रीतिसंगम येथील स्वामीची बाग परिसरात आली असता तिला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याची माहिती मिळताच सर्प मित्र बबलू लोहना यांच्यासह काहीजण तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्याठिकाणी शोध घेत घोणस सर्पाला पकडून ताब्यात घेतले. तर जखमी महिलेस नागरिकांनी तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.