Karad News : मी साहेबांसोबतच… कराडात ठिकठिकाणी बॅनरबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा जास्त समर्थक आमदारांसह पक्षातून बंडखोरी केली आणि शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील झाले. येव्हडच नव्हे तर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केला आहे. पक्षात उभी फूट पडली असून आमदारांची विभागणी झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील कराड तालुक्यात आमदार बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांकडून आम्ही शरद पवार साहेबांसोबत अशा आशयाचे बॅनर्स ठिकठिकाणी लागले आहेत.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. सातारचे खासदार श्रीनिवास पाटील आणि कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी शरद पवार याना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कराड शहरात अनेक ठिकाणी शरद पवारांना पाठिंबा देण्याचे पोस्टर झळकले आहेत. आज गुरुपौर्णिमा असून आम्ही साहेबांसोबत… अशा आशयाचे हे पोस्टर्स आहेत. या पोस्टर्सवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यासह श्रीनिवास पाटील आणि बाळासाहेब पाटील यांचे फोटो झळकत आहेत.

कराड शहरातील प्रत्येक चौकामध्ये अशा पद्धतीनं फोटो लावून शरद पवार यांना आपला पाठिंबा असल्याचे दाखवण्यात आलं आहे. प्रीतिसंगम घाट परिसर, शाहू चौक परिसर याठिकाणी हे बॅनर्स दिसत आहेत. त्यामुळे कराड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या सोबतच आहेत हे स्पष्ट झालं आहे. आज शरद पवार कराड मध्ये दाखल होणार असून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतील आणि रयत शिक्षण संस्थेच्या मिटिंग साठी साताऱ्याला रवाना होतील.