कोयना धरणातून आज सायंकाळी पाणी सोडणार, नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | जिल्ह्याचा पश्चिम भाग सोडला तर उर्वरित जिल्ह्यात पावसाने पुर्णतः विश्रांती घेतली होती. मात्र, बुधवारी कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने दडी मारली. त्यामुळे धरणातील आवक पूर्णपणे थांबली. धरणात सध्या ९०.६७ टीएमसी पाणीसाठा आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त लेझरच्या माध्यमातून धरणाच्या भिंतीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. त्यासाठी आज सायंकाळी ७ वा कोयना धरणाचे वक्र दरवाजे सहा इंचांनी उघडून १,१०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार आहे.

आठवडाभर पावसाने उघडीप दिल्यानंतर बुधवारी जिल्ह्यातील कराड तालुक्यात दुपारनंतर पावसाने काहीशी हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी कोयना धरण विभागाकडून आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात ९०.६७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून 86.15 टक्के धरण भरले आहे.

कराडकरांची उकाड्यापासून काही काळ सुटका

पावसाने दडी मारल्याने काही दिवसांपासून चांगलाच उकाडा जाणवत होता. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. आज सकाळपासूनच उन्हाचा चटका लागत होता‌. त्यात दुपारी अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे सखल भागात चांगलच पाणी साचलं. दमदार पावसामुळे काही काळ नागरीकांची उकाड्यापासून सुटका झाली.

Koyna Dam
Date: 14/08/2024
Time: 05:00 PM
Water level: 2152’02” (655.980m)

Dam Storage:
Gross: 90.67 TMC (86.15%)
Live: 85.55 TMC (85.44%)

Inflow : 0 Cusecs.

Discharges
Radial Gate: 00 Cusecs.
KDPH: 00 Cusecs.

Total Discharge in koyna River: 00 Cusecs

Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 00/4287
Navaja- 00/5096
Mahabaleshwar- 00/4846