पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी झालेलया पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपर्यंत नवजा येथे 20 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे 13 आणि महाबळेश्वरला 22 मिलीमीटरची नोंद झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठाही 33.60 टीएमसीवर पोहोचला आहे. तर सातारा शहरात पावसाची उघडीप कायम राहिली आहे.
सातारा जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस पडत असून आतापर्यंत बहुतांशी भागात पावसाने चांगली हजेरी लावलयामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला. तसेच भात लागणही जोरात सुरू आहे. त्यातच जुलै महिना सुरू झाल्यापासून पाऊस वाढला. मात्र, मागील तीन ते चार दिवसांपूर्वी जोर कमी झाला होता. पण, पुन्हा पश्चिम भागात पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे 20 मिलीमीटर पाऊस पडला. तर एक जूनपासून आतापर्यंत 1 हजार 783 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगर येथे आतापर्यंत 1 हजार 606 तर महाबळेश्वरला 1 हजार 396 मिलीमीटर पाऊस झाला. तसेच तीन दिवस कोयना पाणलोट क्षेत्रातही जोर कमी होता. त्यामुळे कोयना धरणातील आवक कमी झाली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात 6 हजार 620 क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा 33.60 टीएमसी झालेला.
Koyna Dam
Date: 12/07/2024
Time: 08:00 AM
Water level: 2083’01” (634.924m)
Dam Storage:
Gross: 33.60 TMC (31.92%)
Live: 28.48 TMC (28.44%)
Inflow : 6,620 Cusecs.
Discharges
KDPH: 00 Cusecs.
Total Discharge in koyna River: 00 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 13/1606
Navaja- 20/1783
Mahabaleshwar- 22/1396