कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण तालुक्याला मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोपून काढले. अचानक आलेल्या पावसाने बेसावध वाहनधारक, पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरणातील व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कोयना धरणात 104.82 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कोयना धरणाचे दोन वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत दोन वक्र दरवाजे १ फुट उघडे असून त्यामधून ३,१५४ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, आज सकाळी पावसाने उघडी दिली आहे. कोयना धरणात धरण पायथा विद्युत गृहामधून २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू असून कोयना धरणातून नदीपात्रात एकूण ५,२५४ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. आज सकाळी धरण व्यवस्थापण विभागाकडून आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 99.70 TMC इतका पाणीसाठा झाला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाली असून मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. रात्रीपासून कोयनानगर येथे २२, नवजाला ७ तर महाबळेश्वर यथे ९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
Koyna Dam
Date: 03/10/2024
Time: 08:00 AM
Water level: 2163’02” (659.333m)
Dam Storage:
Gross: 104.82 TMC (99.59%)
Live: 99.70 TMC (99.57%)
Inflow : 6,103 Cusecs.
Discharges
Radial Gate: 3,154 Cusecs.
KDPH: 2100 Cusecs.
Total Discharge in koyna River: 5,254 Cusecs
Rainfall in mm-(Daily/Cumulative)
Koyna- 22/5583
Navaja- 07/6817
Mahabaleshwar- 09/6507